अर्थताज्या बातम्या

सकाळी 8 आधी आणि संध्याकाळी 7 नंतर कर्जदारांशी संपर्क करु नये, RBIचा नवा नियम

RBI Rules for Loan Recovery : रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही. धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत.

बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच वसुली एजंट्सना कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिला. या अंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे.

बँकांनी वसुली एजंटांसाठी आचारसंहिता बनवावी

आरबीआयनं म्हटलं आहे की, RE नं हे सुनिश्चित केलं पाहिजे की, ग्राहकांप्रती त्यांची जबाबदारी आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे कमी होणार नाही. मसुद्यानुसार, बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) डायरेक्ट सेलिंग एजंट (DSA), डायरेक्ट मार्केटिंग एजंट (DMA) आणि कलेक्शन एजंट्ससाठी आचारसंहिता तयार करावी.

रिकव्हरी एजंट्सनी कर्जधारकांशी संयमानं अन् व्यवस्थित बोलावं

DSA, DMA आणि पुनर्प्राप्ती एजंट योग्यरित्या प्रशिक्षित आहेत की नाही, हे नियमन केलेल्या संस्थांनी सुनिश्चित केलं पाहिजे. जेणेकरून ते त्यांच्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेनं पार पाडतील. मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं आहे की, RE आणि त्यांचे वसुली एजंट कर्जाची वसुली करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत शाब्दिक किंवा शारीरिक, तसेच, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. यासह, वसुली एजंट कर्जदारांचा सार्वजनिकपणे अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये