नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, शरद मोहोळची पत्नी कडाडली; म्हणाल्या, “शेवटच्या श्वासापर्यंत…”
पुणे : (Sharad Mohol Wife Swati Mohol) माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी केला आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण असल्याचा उच्चार त्यांनी केला. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपण हिंदुत्ववादासाठी काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane Meet Sharad Mohol Wife Swati Mohol) यांनी आज स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल.
आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार.”