सामान्याच सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना, म्हाडाची लॉटरी रखडली; 24 हजार अर्जदार नाराज
मुंबई : (CM Eknath Shinde Mhada Lottery) हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याची नेहमी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) वेळ मिळत नसल्यानं कोकण म्हाडाच्या (Konkan Mhada) घरांची सोडत रखडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोकण म्हाडा मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या विक्रीची सोडत अजुनही झालेलीच नाहीये.
दरम्यान, सोडत जरी 5 हजार 311 घरांची असली तरी यामधले 24 हजार अर्जदार सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे जवळपास 24 हजार अर्जदार नाराज असल्याचे समोर आले आहे.
एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या 2278 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत पुढे ढकलतानाच लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता नव्या वर्षाचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही.