ताज्या बातम्यामनोरंजन

जीतू भैय्या इज बॅक! कोटा फॅक्ट्री-3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Kota Factory 3 : देशभरातील लाखो विद्यार्थी आयआयटी परीक्षा देण्यासाठी अथक मेहनत घेत असतात. ‘द व्हायरल फिव्हर’ (TVF) अनअकॅडमीच्या सहयोगाने ‘कोटा फॅक्टरी’ ही समकालीन सीरिज 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल यांभोवती फिरणारी या सीरिजची कथा होती. प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या या सीरिजचा तिसरा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोटा फॅक्ट्री-3 सीरिजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

जितेंद्र कुमारसोबतच मयूर मोरे, रंजन राज, आलम खान, अहसास चन्ना हे कलाकार देखील कोटा फॅक्ट्री- 3 मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सीरिजमध्ये जीतूची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमार हा खऱ्या आयुष्यातसुद्धा कोटाचा विद्यार्थी होता. या भूमिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. कोटा फॅक्ट्री-3 ची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही पण 17 जुलैला ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कोटा फॅक्ट्री-3 चा टीझर हा सुद्धा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये