इतरटेक गॅझेटताज्या बातम्या

ट्विटरच्या ‘या’ नव्या बदलानं सोशल मीडियावर एकच खळबळ, ब्लू टिक असणाऱ्या युजर्सना मोठा धक्का

मुंबई | Twitter Verified – गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर (Twitter) अनेक बदल होताना आपल्याला दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरचा आयकाॅनिक लोगो ब्लू बर्ड काढून त्याजागी Doge Image दिसत होती. तर आता ट्विटरनं पुन्हा एकदा आयकाॅनिक लोगो ठेवला आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक बदल केला आहे. ‘ट्विटर व्हेरीफाईड’ने आता सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफाॅलो केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

ट्विटरनं ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, 1 एप्रिलपासून कंपनीने सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्या युजर्ससाठी चेकमार्क (ब्लू टिक) काढून टाकण्याचा इशाराही दिला होता. यासंदर्भात एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ट्विटर ब्लू मेंबरशिप ज्यांच्याकडे नाही, त्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात येईल. या दरम्यान आता ट्विटर व्हेरिफाईडकडून सगळ्या युजर्सना अनफॉलो करण्यात आलं आहे.

दरम्यान, ट्विटरच्या सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत, आता कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक विक घेऊ शकणार आहे. सोबतच ब्लू टिक युजर्सना काही अतिरिक्त सुविधा देखील मिळणार आहेत. तसंच ट्विटमध्ये एडिट किंवा अनडू हे पर्यायही उपलब्ध असतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये