Top 5देश - विदेशमनोरंजनलेख

काश्मीर बदलतंय…

जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देणारे घटनेतले ३७० वे कलम रद्द केल्याने आणि तिथे लागू करण्यात आलेले कलम ३५ अ मागे घेतल्याने त्याचे पडसाद उमटतील, अशी अनेकांची अपेक्षा होती , पण किरकोळ वाद-विवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

एक सफर | विजय कुलकर्णी

काश्मीर हे निसर्गरम्य वैभव, बर्फाच्छादित पर्वत, विपुल वन्यजीव, उत्कृष्ट स्मारके, आदरातिथ्य करणारे लोक आणि स्थानिक हस्तकलेसाठी जगप्रसिद्ध आहे आणि म्हणूनच ते “पृथ्वीवरील स्वर्ग” म्हणून काश्मीरकडे बघितले जाते. सुरक्षितता आणि सुरक्षेच्या दृष्टीने, काश्मीरला भेट देण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध होत आहे.

काश्मीरचे वैभव इतर कोणत्याही ठिकाणाहून अतुलनीय आहे. काश्मीर हे काही आश्चर्यकारक नैसर्गिक लँडस्केप्स आणि बर्फाच्छादित पर्वत, हिरवी कुरण, सुंदर तलाव आणि मनमोहक धबधब्यांसह चित्र-परिपूर्ण पर्यटनस्थळांचे घर आहे. काश्मीरमध्ये घालवलेला वेळ आनंददायी आणि ज्ञानवर्धक आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही काश्मीरमधील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांची पाहणी केली. ज्याकडे आपण आजपर्यंत दहशतवाद्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेले काश्मीर आता बदलत असल्याचे दिसत आहे.

पूर्वी दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कुपवाडा जिल्ह्यात फारसे पर्यटक येण्यास धजावत नसतं, परंतु गेल्या काही वर्षांपासून दगडफेक व बंदच्या घटनांमध्ये घट झाल्यामुळे या भागात आता पर्यटन करणे शक्य झाले आहे. कुपवाडा जिल्ह्याच्या आजूबाजूचा परिसर जवळून पाहता आला. टिटवाल व केरेन खोऱ्यातील नियंत्रण रेषा, बंगस व्हॅली, कालारुस, तेथील सरकारी शाळा वगैरे ठिकाणांना भेट देता आली. बर्फवृष्टीची मजाही घेता आली. श्रीनगरमधील लाल चौक, दाल लेक येथील शिकाराच्या सफरीचा आनंद अल्हादायी ठरला. तेथील लोकजीवन जवळून अनुभवता आले.

काश्मिरचे हवामान, तेथील नागरिक, तिथली सौंदर्य स्थळे एकूणच सगळंच अप्रतिम आहे. तेथील नागरिक अतिशय कष्टाळू, प्रेमळ आणि दिसायला अप्रतिम आहेत. तेथील भात- राजमा, छोले भटुरे अप्रतीम होते.

मार्च असला तरी तिकडे अजूनही कडाक्याच्या थंडी अनुभवायला मिळाली. त्यामुळे तेथील तापमानाशी जुळवून घेता घेता आम्हाला मोठी कसरत करावी लागली. थंडी जरी असली तरी काश्मिरी वातावरण खूप सुंदर आहे. रस्त्यावर सर्वत्र लष्करी सैनिक तैनात असतात, वातावरण जरी निवळले असले तरी लष्कर मात्र ठिकठिकाणी दिसून येते. स्वच्छ हवा, उंच उंच पर्वत, नदी, बर्फाळ प्रदेश मनाला सगळे भावून गेले. केरेनवरून परत येताना बर्फवृष्टीचा एक वेगळा अनुभवही घेता आला.

कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी कुपवाडा जिल्ह्याच्या विकासासाठी उचललेले पाऊल खरोखरचं कौतुकास्पद आहे. त्यांनी अनेक ठिकाणी विकासाची कामे सुरू केल्यामुळे जिल्ह्याचे स्वरूप बदलत आहे, ही एक मोठी नक्कीच गौरवास्पद ठरत आहे. एक मराठी माणूस काश्मिरसारख्या ठिकाणी हे सर्व करतो याचा खरोखरचं कौतुक वाटले. याशिवाय टाऊन कमांडर लेफ्टनंट कर्नल अमित माने यांची भेट घेता आली. तसेच साधना टॉप (मूळ नाव -नाश्ताचून पास) येथील नार्कोटिक्स विभागाचे लष्करी अधिकारी श्री. कोळी यांचीदेखील भेट घेता आली. काश्मीरमध्ये तीन मोठे मराठी अधिकारी भेटल्यामुळे खूप छान वाटले.

१९६५ च्या युद्धानंतर नाश्ताचून पास या ठिकाणी अभिनेत्री साधना यांनी भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला. त्यामुळे साधना यांच्या स्मरणार्थ या ठिकाणाचे नाव साधना टॉप असे ठेवले गेले. जे जमिनीपासून १० ते 12 हजार फुटावर आहे. काश्मीरमधील प्रत्येक सौंदर्यस्थळाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे. शांतता आणि मोहकता वाहणारे ठिकाण – हेच काश्मीरची उत्तम व्याख्या करते. ‘पृथ्वीवरील नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्रवासाचा मार्ग म्हणजे हिम-पांढरे पर्वत, भरपूर वन्यजीव, उत्कृष्ट लँडस्केप आणि अप्रतिम हस्तकला यांचा शोध घेणे. तसेच काश्मीरची भेट सर्वांसाठी संस्मरणीय ठरेल पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो येथे आहे.

येथे वेगवेगळे चहाचे नमुने पहायला मिळतात. श्रीनगरच्या प्रसिद्ध हाऊसबोट्स आनंद त्याठिकाणी खरंच घेण्यासारखा आहे.
हे काश्मीर खोऱ्यातील पर्यटन आणि मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरच्या मुकुटातील रत्न म्हणून ओळखले जाते.
टिक्कर रागन्या आस्थापन, ज्याला मत्ता खीर भवानी अस्थापन टिकर असेही म्हटले जाते, येथे नव्याने बांधलेल्या शारदा यात्रा मंदिर उभारण्यात आले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ टीटवाल.

24 जानेवारी रोजी, सेव्ह शारदा कमिटी काश्मीर (SSCK) ने शारदा मूर्ती कर्नाटकातील शृंगेरी ते कुपवाडा जिल्ह्यातील LoC Teetwal पर्यंत नेण्याची ट्रान्स नेशन यात्रा सुरू केली होती. बंगळुरू, मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर आणि गुडगाव आणि जम्मू येथे मुक्काम केल्यानंतर ही यात्रा आठवडाभरापूर्वी टिक्कर कुपवाडा येथे पोहोचली आहे.

तत्पूर्वी, शृंगेरी दक्षिणायम शारदा मठ, सेव्ह शारदा कमिटी काश्मीर यांच्या निमंत्रणावरून, SSCK ने LoC Teetwal येथे नव्याने बांधलेल्या शारदा मंदिरासाठी पंचधातू शारदामूर्ती प्राप्त केली.

२२ मार्च 2023 रोजी शारदा माता मूर्तीची बसविण्यात आली. तसेच नव्याने बांधलेल्या शारदा यात्रा मंदिराचे उद्घाटन झाले आहे.
टीटवालच्या स्थानिकांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी हा भूखंड जतन करून सेव्ह शारदा कमिटी काश्मीरला सुपूर्द केला. इतकेच नाही तर टीटवालच्या स्थानिकांनी मंदिरासाठी अ‍ॅप्रोच रोडच्या बांधकामासाठी मोफत जमीन दान केली आणि मंदिराच्या बांधकामासाठी मदत केली.

“जिल्हा प्रशासन कुपवाडा यांनी आयोजकांना आणि यात्रेकरूंना पुरवले जाणारे लॉजिस्टिक सपोर्ट आणि सुविधा उत्कृष्ट आहेत आणि तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्य देखील उत्कृष्ट आहे. कुपवाड्याचे जिल्हाधिकारी “डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे, व जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी यांनी केलेले प्रयत्न नक्कीच जातीय सलोखा, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेला मोठ्या प्रमाणात हातभार लावतील,” असे यातून दिसून येत आहे.

  • sunday 6
  • kashmir 1
  • kashmir 1
  • sunday 5
  • sunday
  • sunday 2
  • kashmir 2
  • kashmir 3
  • kashmir 6

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये