ताज्या बातम्यारणधुमाळी

“मी बांगड्या भरल्या नाहीत, वेळप्रसंगी…”; उदयनराजेंचा भाजपला आक्रमक इशारा

मुंबई | Udayanraje Bhosale – काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान, आज (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून यावर उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी उदयनराजे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून शिवाजी महाराजांंविषयी वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. मोठमोठे नेते ही विधानं करत आहेत. शिवाजी महाराजांचं नाव घेतात, त्यांच्याविषयीच वादग्रस्त विधानं करत आहेत. यावर माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे. सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींनी वादग्रस्त विधान करणाऱ्यांविरोधात भूमिका घ्यायला हवी. त्यादिवशी मी भावूक झालो. मात्र, मी काही बांगड्या भरल्या नाहीत. वेळप्रसंगी निर्णय घेऊ”, असा आक्रमक इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मंगल प्रभात लोढा?

“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं वक्तव्य लोढा यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये