शिंदेचा घोटाळा ठाकरेंकडून उजाडात? 8 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा, उद्धव ठाकरेंचा दावा
मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) महायुती सरकारने एक रुपयात पीकविमा ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेवरूनच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात 8 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता पुन्हा महायुती विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी समस्येवरून शिंदे सरकारचे वाभाडे काढले आहेत . ठाकरे म्हणाले, पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. कारण एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने (State Government) 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यावर घेतले, मात्र यातून शेतकऱ्यांच्या हाती निराशाच मिळली असल्याचा आरोप करत सरकारवर ताशेरे ओढले.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने एवढे हजारो कोटी पीक कंपन्यांना दिल्यावरही त्यांची कार्यालये बंदच आहेत. कोणी फोन घेत नाही, कुणाकडून दाद मिळत नाहीत. ते सरकारचं ऐकत नाही आणि शेतकऱ्यांना सामोरेही जात नाहीत. त्यामुळे हा पैसा त्या कंपन्यांच्या नावाने कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण हा पैसा करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांना किती पैशांचे मदत मिळाले पाहिजेत आणि किती रुपयांचे चेक मिळत आहेत, ते बघायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे केले.