काँटे की टक्कर! भारत पराभवाचा वचपा काढणार? ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
रायपूर : (India Vs Australia 4th T20I) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामना हा आज छत्तीसगडमधील रायपूर येथे होत आहे. मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2 – 1 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत भारताचा मालिका विजय लांबणीवर टाकला होता.
हा लांबणीवर टाकलेला मालिका विजय आज रायपूरमध्ये मिळवण्यासाठी भारतीय संघ कसोशीने प्रयत्न करेल. भारतीय संघातील फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असून श्रेयस अय्यर देखील या यामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रायपूरमधील सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत. भारताने तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि इशान किशन यांच्या ऐवजी श्रेयस अय्यर, दीपक चाहर, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियानेही आपल्या संघात 4 बदल केले आहेत.