क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टीम इंडियाचा WTC फायनलचा मार्ग मोकळा; श्रीलंकेच्या स्वप्नावर पावसाने फेरल पाणी!

अहमदाबाद : (World Test Championship 2023 Final) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला सामना संपण्यापूर्वीच सर्वात मोठी भेट मिळाली आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी तिकीट भेट दिले आहे.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने खराब खेळ केला. अखेरच्या दिवशी सामन्याचा निकाल यजमानांच्या बाजूने लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दमदार सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर जिंकणे आवश्यक होते आणि येथे केन विल्यमसनने बॅट चुकल्याने धाव पूर्ण केली. यासह श्रीलंका WTC अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, यासह भारत WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे, त्याच दरम्यान न्यूझीलंडमधुन आनंदाची बातमी आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून या कालावधीत होणार आहे. सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्याला न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये