फिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

यशाच्या मार्गातील अडथळे दूर करताना…

यश मिळवणे कधीच सोपे नसते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करताना त्यात अडथळे येतात. अडथळ्यांवर मार्ग काढावा लागतो. त्यानंतर पुढची वाटचाल सुरू ठेवावी लागते. कुठल्याही अडथळ्याविना यश मिळाले आहे असे फार क्वचित होताना दिसते. अडथळे येणे ही सामान्य बाब आहे. कुठल्याही यशवंत व्यक्तीला विचारून पहा. प्रत्येकाला त्या यश प्राप्तीमध्ये अडथळे आले आहेत. त्यावर मात करून त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली असेच आपल्याला दिसेल.

काही महत्वाच्या गोष्टी
कुठल्याही अडथळ्यावर उपाययोजना करताना प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण करत राहावे लागते. निवडलेली उपाययोजना योग्य प्रकारे घडते आहे का, याची खात्री करावी लागते. उपायोजना करताना वेळ लागणार असेल, तर धैर्य आणि चिकाटी यांची आवश्यकता भासते. तसेच निवडलेला मार्ग योग्यच आहे का, याबद्दल स्वतःला खात्री असावी लागते. अर्धवट तयारीनिशी किंवा साशंक मनाने कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही. त्यामुळे आधी स्वतःचीच पूर्ण खात्री होऊ देणे योग्य ठरते. अडथळा ओलांडताना काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. त्यात जवळचेच लोक दुखावले जाऊ शकतात, अशा अनेक गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतात.

अडथळे दूर करण्यासाठी काय करावे लागते याचा एक फॉर्म्युला नाही. मार्ग वेगवेगळे तसे अडथळेही वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या सर्वांवर एकच मार्ग असणे कठीण आहे. मात्र अडथळ्यांची गुंतागुंत कशी सोडवावी यावर काही टिप्स् अवश्य शेअर करता येतील. येथे दिलेल्या काही गोष्टी आपल्यापुढील अडथळे सोडविण्यासाठी उपयोगी पडतात का, ते पहा. आपल्याला या पलीकडेही अनेक टिप्स् सुचू शकतात. त्याही तपासून पहाव्या.

पार जाण्याची मनोवृत्ती हवी
स्टीपलचेस शर्यत आपण पाहिली असेल. त्यात मार्गात ओलंडलेल्या अडथळ्यांवर ओलांडूनच पुढे धावावे लागते. सर्वात आधी आपल्याला अडथळ्यांवर स्वार होण्याची मनोवृत्ती निर्माण करावी लागेल. अडथळा ओलांडून मी पुढे जाईन त्यासाठी आलेल्या अडथळ्याकडे आधी डोळसपणे पाहून विचारपूर्वक तो दूर करण्याचा ठरवेन- ही मनोवृत्ती आवश्यक असते. तरच अडथळे पार करता येतील.

स्वरूप समजून घ्यावे
अडथळा आलाच तर नाउमेद होऊन चालत नाही. किंवा नुसते बसूनही उपयोग नसतो. सर्वात आधी आपल्याला समोरच्या अडथळ्याचे स्वरुप समजावून घ्यावे लागेल. त्यामुळे तो किती गंभीर किंवा महत्वाचा आहे याचे आकलन होईल. त्यानंतर आपल्या इतर कामांच्या प्रायॉरिटीमध्ये त्याला बसवता येईल. त्या प्राधान्यानुसार तो कधी आणि कसा सोडवायचा हे ठरवता येईल. अडथळ्याचे स्वरुप समजून घेतले तर तो दूर करण्यासाठी काय उपाय योजायचे याची स्पष्टता येईल, असे सांगितले जाते. अडथळे मोठे असतील तर त्यासाठी वेळ आणि प्रयत्नही अधिक लागू शकतात.

उपाय एक्स्पोलर करा
अडथळा समजल्यानंतर मनात आलेला पहिला उपाय अडथळा सोडविण्यासाठी वापरला असे बरेच जण करतात. मात्र सर्वात आधी सुचलेला उपाय हाच सर्वोत्तम असेल असे काही नसते. त्यामुळे आधी सर्वोत्तम उपाय शोधावा लागेल. त्यासाठी जे जे उपाय मनात येतील त्या सर्वांची यादी बनवावी लागेल. ही विस्तृत यादी बनवा त्या सगळ्यांपलीकडे काही उपाय नाही, असे वाटावे इतकी विस्तृत ही यादी होऊ शकते.

सर्वोत्तम उपाय निवडा
समोर आलेल्या प्रत्येक उपाययोजनेच काही लाभ असतात तसेच प्रत्येक उपायाचे काही तोटेही असू शकतात. काही चटकन होणारे उपाय दीर्घ काळाचा विचार करता मात्र अडचणीत आणू शकतात. हे सगळे उपाययोजना प्रारंभ करावा असे सुचविले जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये