क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना! भररस्त्यात तिघांना भोसकले

Pune koyta Gang : वेगात विकसित होणाऱ्या महत्वाच्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. परंतु आता मात्र दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

दरम्यान, ही कारवाई ताजी असतांनाच पुण्यात कोयता गँगच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी रात्री खडकवासला येथील गोहे बुद्रुक येथे १० जणांच्या टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील पुढे आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये