ताज्या बातम्यापुणे

गुजरातला भुसा घेऊन निघालेला ट्रक अपघातानंतर नवले पुलावर पेटला, चार जणांचा होरपळून मृत्यू

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकनं कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर या ट्रकनं पेट घेतला. त्यामुळे चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर झाले आहेत. ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.

पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र (Pune Navale Bridge Accident) सुरूच असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.

चार जणांचा मृत्यू

अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांचा आकडा चार इतका आहे. तर दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे. परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये