नागपूर हादरलं! मध्यरात्री भाजप पदाधिकाऱ्याची निघृण हत्या, धक्कादायक माहिती आली समोर
नागपूर | Nagpur Murder : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील पंचगाव येथील एका भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आली. राजू डेंगरे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
राजू डेंगरे यांच्या मृतदेह मध्यरात्री विहिरगाव परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर डेंगरे यांचा मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. राजू डेंगरे यांच्या हत्येमुळे नागपूरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
तर राजू डेंगरे यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. डेंगरे हे ग्रामपंचायत निवडणुकीतले विजयी उमेदवार होते. तर त्यांची हत्या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्राथमिक संशय आहे. राजकीय वैमनस्यातून डेंगरेंची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील तपास करत आहेत.