ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ भीषण आग
पिंपरी | Tathawade Fire News – ताथवडे (Tathawade) येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ (JSPM Collage) मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर तिथे भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. जेएसपीएम महाविद्यालयाजवळ मोकळ्या जागेत एका एलपीजी गॅसच्या टँकरला भीषण आग लागली होती. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका बालाजी कॅरियरच्या टँकरमधून एलपीजी गॅस सिलींडरमध्ये भरताना मोठा स्फोट झाला. यावेळी संबंधित टँकरला आग लागल्यामुळे तेथील गॅस सिलींडर उडून जवळच्या उभ्या असलेल्या बसवर पडल्याने त्या दोन्ही बस जळून खाक झाल्या. यामध्ये एका बुलेटचं देखील नुकसान झालं आहे.
या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. तर अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाला यश आले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.