ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत घुसला अनोळखी व्यक्ती; त्यानं प्रश्न विचारताच पाटील गडबडले; म्हणाले, “कोण तू…”

पुणे | Chandrakant Patil : आज (21 डिसेंबर) पुण्यात (Pune) चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) पत्रकार परिषद सुरू असताना मोठा गोंधळ निर्माण झाला. चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत अचानक एक अनोळख व्यक्ती घुसला. तसंच त्या व्यक्तीनं पाटलांना प्रश्न विचारताच ते गडबडले. तसंच तू कोण आहेस? असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना त्याला बाजूला नेण्याच्या सूचना केल्या. यामुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव सुरू आहे. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेत वन विभागाच्या परीक्षांची तयारी करणारा एक तरूण घुसला. त्यावेळी त्यानं चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानं प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील गडबडले आणि म्हणाले तू कोण आहेस? तू पत्रकार आहेस का? त्या तरूणानं नकार देताच पाटलांनी पोलिसांना त्याला बाजूला नेण्याच्या सूचना केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारणारा तरूण हा गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. या तरूणाचं नाव कृणाल आहे. तर अनेकदा प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागलेली नाहीये. त्यामुळे त्यासंदर्भात त्याने चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला. पण तो पत्रकार नसून सामान्य व्यक्ती होता. त्यामुळे त्याला तेथून बाजूला करण्यात आलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये