क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारत-पाकिस्तान महामुकाबला पुन्हा रंगणार! तारीख, वेळ, वार अन् ठिकाणं ठरलं!

India vs Pakistan T20 World Cup 2024 : जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर असतात, तेव्हा जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला त्यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा आनंद घ्यायचा असतो. कारण भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात जो थरार पाहायला मिळतो तो या दोन देशांमधील इतर कोणत्याही सामन्यात दिसत नाही.

या’ तारखेला होणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील सामना (IND vs PAK) T20 विश्वचषक 2024 मध्ये होईल. दोन्ही देशांचे करोडो चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, T20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अमेरिकेतील न्यूयाॅर्कमध्ये 8 किंवा 9 जून रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात अलीकडेच 3 सामने खेळले गेले आहेत. आशिया कप 2023 मध्ये दोन आणि विश्वचषक 2023 मध्ये एक सामना खेळवला गेला. त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकले होते तर एक सामना पावसामुळे वाहून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये