‘बिग बॉस’नंतर अंकिता विकीला देणार घटस्फोट? म्हणाली, “मला तुझ्यासोबत…”
मुंबई | Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 17) घरात आल्यापासून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात काहीना काही कारणांवरून वाद होताना दिसत आहे. ते सतत एकमेकांशी भांडताना दिसतात. तर आताही अंकिता आणि विकीमध्ये वाद झाला असून तो इतका टोकाला गेला की अंकिता आणि विकी एकमेकांपासून विभक्त होणार की काय, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.
आयेशा खाननं विकी जैनला त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना विकीनं मस्करीत विवाहित पुरूषांच्या समस्यांबाबत सांगण्यास सुरूवात केली. ते पाहून अंकिता नाराज होते आणि विकीला त्याचं कारण विचारते. त्यावर विकी म्हणतो, मला काय वाटतं याबाबत मी कधीच सांगू शकत नाही. खासकरून पुरूष आणि विवाहित लोक या परिस्थितीचा सामना करतात. ते कोणत्या परिस्थितीचा सामना करत असतात किंवा त्यांना काय त्रास होतो? याबाबत ते कधीच खरं सांगू शकत नाहीत.
विकीचं हे उत्तर ऐकून अंकिता संतापते आणि घटस्फोटाबद्दल बोलते. जर तुला इतका त्रास होत आहे तर तू माझ्यासोबत का राहत आहेस? चल आपण घटस्फोट घेऊ, मला तुझ्यासोबत घरी जायचं नाही, असं अंकिता भावूक होत म्हणते.
पुढे अंकिता आयेशाला म्हणते, विकी माझ्यावर खूप प्रेम करतो हे मला माहिती आहे. पण तो मला ते देण्यास असमर्थ आहे जे मला खरंच हवं आहे. पण कधी कधी माझ्यावर त्याचं खूप नियंत्रण असल्याचं वाटतं. ते मी अनुभवलंय देखील.