भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ; ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक
मुंबई | Datta Dalvi Arrest : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) भरसभेत शिवीगाळ केली. त्यामुळे आता दत्ता दळवींना शिवीगाळ करणं चांगलंच भोवलं आहे. मुंबई पोलिसांनी दळवींना अटक केली आहे. तसंच त्यांना आज सकाळी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तर दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दत्ता दळवी यांच्याविरोधात भूषण पलांडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दळवींना अटक करण्यात आली. दळवींना अटक केल्यानंतर खासदार संजय राऊत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
रविवारी भांडुपमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये राजस्थान प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावापुढे लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवींनी शिवीगाळ केली होती.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी दत्ता दळवींना त्यांच्या विक्रोळी येथील घरातून अटक केली.