उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली!
शिरुर | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली.
पुढे अजित पवार म्हणाले, आपला वेगळा फाटा आहे त्यांचा वेगळा फाटा आहे. आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलं आहे. उगीच मनात काही शंका ठेऊ नका. आता त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाला. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच.
डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते…
ते म्हणाले की, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली.