मानधनासाठी त्यांनी नथुराम गोडसेची भुमिका साकारली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा अमोल कोल्हेंवर घणाघात
शिरूर | खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या होमपिचवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थित शेतकरी मेळावा होत आहे. दरम्यान, अजित पवारांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी मेळाव्यातुन गावोगावचे सरपंच, सदस्यांचा, सोसायटी चेअरमन अशा अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळे (Ravi Kale) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केलाय.
अमोल कोल्हेंवर घणाघात
खासदार अमोल कोल्हे यांनी मानधनासाठी नथुराम गोडसेची भुमिका साकारली. आता मानधनासाठी औरंगजेबाचीही भूमिका साकारतील, असं म्हणत शिरुरच्या शेतकरी मेळाव्यातून अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधलाय.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली. त्याचा अभिमान ठेवून लोकांनी त्यांना साथ दिली. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटीलांनी पाच वर्षापुर्वी राजकीय रणनिती आखली. त्यामुळे खासदार अमोल कोल्हेंचा विजय झाला. पण काहीच दिवसात तुम्ही मानधनासाठी नथुराम गोडसेची भुमिका केली. पुढच्या काळात मानधनासाठी औरंगजेबाचीही भूमिका कराल असं म्हणत अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळेंनी भावना व्यक्त करत खासदार कोल्हेंवर निशाना साधला आहे.