अमृता फडणवीस यांचे आणखी एक गाणे चाहत्यांच्या भेटीला!
Amruta fadnavis New Song : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचं नाव “तुम्हें आईने की जरुरत नहीं” (Tumhein Aaine Ki) असं आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या नव्या गाण्याची माहिती दिली आहे.
गायिका अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे नाव ‘तुम्हे आईने की जरुरत नही’ असे आहे. या गाण्याची लिंक अमृता यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केली आहे. ‘अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न करणारे तुम्हे आईने की जरुरत नही हे माझे गाणे प्रदर्शित झाले आहे’ असे अमृता यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच यूट्यूबची लिंक शेअर केली आहे.
अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता त्यांचे ‘तुम्हे आईने की जरुरत नही’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या आधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.