सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! भरगच्च भरलेली संसद अन् अज्ञातांनी जाळले स्मोक कँडल
नवी दिल्ली | Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2023) एक खळबळजनक घटना घडली आहे. आता संसदेत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण संसदेचं काम सुरू असतानाच भर लोकसभेत एकानं प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. तर त्याच्यासोबत आणखी दोनजण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तू आढळल्या आहेत. त्यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभेचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होतं. तर अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसंच प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहत होते. या गर्दीत तीनजण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली खासदार जिथे काम करतात तिथे उडी मारली. त्यावेळी या अज्ञातांकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती.
जेव्हा दोन लोकांनी गॅलरीतून उडी मारली त्यावेळी संसदेत अचानक धूर सुरू झाला. त्यानंतर या दोघांना पकडण्यात आलं. तर या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती एका खासदारानं दिली आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीनं गॅलरीतून उडी मारली आहे त्यातील एकाचं नाव सागर असल्याची माहिती समोर आली आहे. तर तो व्यक्ती कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे.