आरोग्यताज्या बातम्याफिचर

चिकनला पर्याय, अन् प्रोटीनचा चांगला स्त्रोत कच्चे पनीर; जाणून घ्या फायदे..

Panir Benefit News : पनीर हा भारतीयांचा आवडीचा पदार्थ आहे. पनीर आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. शाकाहारी लोकांसाठी पनीर प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. पनीरमध्ये सेलेनियम, कॅल्शियम, फाॅस्फरस आणि पोटॅशियम असते. जे शरीरास अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यास मदत करु शकते. पनीरमध्ये असणारे पोटेशियम आपल्या मेंदूसाठी विशेषतः स्मरणशक्तीसाठी खूप गुणकारी मानले जाते. तेच सेलेनियम प्रजनन क्षमता वाढवते. कच्च्या पनीरमध्ये कॅल्शियम आणि फाॅस्फरसचे प्रमाण चांगले असते. यामुळे हडे मजबूत होण्यास मदत होते. चला तर मग कच्चे पनीर खाण्याचे फायदे जाणून घेवू.. 


१.तणाव दूर करण्यास मदत

– आजच्य धावपळीच्या जीवनात बहुतेक जण तणावात असतो. यापासून बचावासाठी तुम्हाला आरोग्यदायी डायटची आवश्यकता आहे. पनीरचे सेवन यापासून तुम्हाला मदत करु शकते.

२. हडे मजबूत
– कमजोर हडांची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डायटमध्ये कच्चे पनीरचा समावेश करु शकता. कारण या कच्च्या पनीरमध्ये कॅल्शियम आणि फाॅस्फरसची मात्रा अधिक असते.

३. लठ्ठपणा कमी करण्यास मदत
आज लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनली आहे. जर तुम्हाला तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर कच्चे पनीरचे सेवन करावे. यात लिनलाईक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करु शकते.

४. शरीराचा थकवा दूर करतो

– थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पोषक तत्त्वे असलेले पदार्थांचे सेवन करा. कच्च्या पनीरमध्ये प्रोटीनसह अनेक पोषक तत्त्व असतात, जी तुमच्या शरीरातील थकवा आणि कमजोरी दूर करण्यास मदत करु शकते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये