ताज्या बातम्यामुंबईसिटी अपडेट्स
Kurla LTT Fire : लोकमान्या टिळक टर्मिनस स्टेनशच्या कॅन्टीनमध्ये भीषण आग
Kurla LTT Railway Station Fire | कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या (Kurla LTT Railway Station) जन आहार कॅन्टीमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरील कॅन्टीमध्ये आग लागल्यामुळे धुराचे लोट बाहेर पडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मराची तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. तर या आगीत सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.