डिसेंबरच्या अखेरीस तब्बल ‘इतके’ दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!
Bank Holidays in December : 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे.
डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील 7 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच पूर्ण करायला हवीत. येत्या काही दिवसात अनेक सुट्ट्या येणार आहेत, त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण करा. शेवटच्या दिवसात बँकेत खूप गर्दी असू शकते, त्यामुळे जी कामे ऑनलाइन पूर्ण करता येतील, ती घरबसल्या पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
या तारखांना बँका बंद
23 डिसेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
24 डिसेंबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमुळे आयझॉल, कोहिमा, शिलाँगसह इतर काही राज्यांमध्ये सुट्टी असेल.
27 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद राहतील.
30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु कियांगमुळे बँका बंद राहतील.
31 डिसेंबर 2023- रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी