निरोगी आरोग्याचा संदेश देत राज्यभरातील डॉक्टर्स आणि नागरिकांसाठी ‘पावनखिंड मॅरेथॉन’
टेंभुर्णी | सोलापुर-पुणे सर्विस रोड, मार्स हॉस्पिटलच्या पुढे,टेंभूर्णी येथे रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी ‘सर्वांसाठी निरोगी आरोग्य’ हा संदेश देत माढा तालुका डॉक्टर असोसीएशन अंतर्गत, डॉक्टर्स असोसीएशन टेंभूर्णी आयोजित भव्य पावनखिंड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनकेले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील डॉक्टर्स आणि नागरिक सहभागी होत आहेत.
दैनिक राष्ट्र संचार या भव्य पावनखिंड स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे. तसेच पंढरपूर येथील नवजीवन हॉस्पिटल चे प्रायोजकत्व आहे. राज्यभरातील डॉक्टरांच्या वतीने सर्व डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा होणार आहे
मुंबई, पुणे, सोलापुर मध्ये होणारी मॅरेथाॅन स्पर्धा आता आपल्या टेंभूर्णी शहरांमध्ये होणार असल्याने टेंभुर्णी करांमध्ये मोठा उत्साह आहे. माढा तालुका डॉक्टर असोसीएशन अंतर्गत, डॉक्टर्स असोसीएशन टेंभूर्णी ने ही स्पर्धा रविवार दीनांक- २४ डिसेंबर रोजी सकाळी ५वाजता आयोजित केली आहे. १० किमी. आणि ३ किमी अशा दोन प्रकारात तसेच लहान मुलांसाठी स्कुल रन आहे. राज्यभरातून – यासाठी सहभागी होण्याची – संधी डॉक्टर असोसिएशनने दिली आहे.
‘रन फ़ॉर हेल्थ’ ही संकल्पना घेऊन स्वताःचे आरोग्यस्वास्थ उत्तम ठेवन्यासाठी तसेच निरोगी शरीर राहण्यासाठी चालणे-धावणे कीती महत्त्वाचे आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवु या उद्देशानी ही स्पर्धा टेंभूर्णी डॉक्टर्स असोसीएशन ने राबवलेली आहे. ही मैरथॉन सर्व वयोगटासाठी खुली असणार आहे (कोणत्याही वयाची अट नाही) तसेच सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, नाश्ता-एनर्जी ड्रिंक देण्यात येणार आहे, तसेच विजेत्याना रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रारंभिक नावनोंदणी आवश्यक आहे, यासाठी डॉ विशाल जाधव (८१४९२२७७३७) आणि डॉ. सतीश साळुंखे (९९७०००२३४६) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.