ताज्या बातम्यापुणेशिक्षण

पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाचा पेपर फुटला; परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) हिवाळी सत्र परीक्षेत आज एमबीए अभ्यासक्रमातील लीगल ॲस्पेक्ट ऑफ ऑफ बिझनेस (legal aspects of business) या विषयाचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे समाजमाध्यमाद्वारे दिसून आले असून, या विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. 22 डिसेंबर रोजी MBA 2009 रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती. परंतु तत्पूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार

विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)घेतल्या जाणाऱ्या लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द केला आहे. चिखली येथील डी वाय पाटील कॉलेजमधून या विषयाची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असंसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे (Mahesh Kakde) यांनी सांगितलं आहे.

परिक्षा कधी होणार?

परीक्षेचे संवेदनशीलता गोपनीयता व पवित्र लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर आता येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 : 30 या वेळेत घेतला जाणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये