भरधाव PMPLला कार आडवी लावून बस चालकाला बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार…
Pune :
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील आंबवणे परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आली आहे. विंझर गावाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या PMPML चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या काही मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालक जखमी झाला आहे. बुधवारी हा सर्व प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील विंझर गावातून पुण्याच्या दिशेने PMPML चालली होती. त्यावेळी आंबवने गावाजवळ बसच्या पुढे चाललेली चारचाकी गाडी एमएच १२ पीक्यू ७१३७ ही वेडी वाकडी वळणे घेत चालली होती. त्यावेळी बस चालक तेजस गायकवाड यांनी हॉर्न वाजवत गाडी बाजूला घेण्यास सांगितले. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्या चारचाकी गाडीत चालकासह दोन अल्पवयीन मुले व एक युवक असे चौघेजण होते.
PMPML चालकाचे नाव तेजस चंद्रकात गायकवाड (वय ३५) असं असून त्याच्या कानाला या मारहाणीत गंभीर जखम झाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दखल केला असून एकाला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. निलेश पंढरीनाथ सरपाले (वय २६) असं अटक केलेल्याचे नाव व त्याच्या सोबतचा श्रेयस काळूराम सरपाले हा फरार झाला आहे.
बस चालकाने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने कार चालकाने PMPML बसला कार आडवी लावून बस रोखून धरली. तसेच कारमधील युवक श्रेयस सरपाले याने बस चालक तेजस गायकवाड यांना जोरदार शिवीगाळ आणि दमदाटी करत बिअरची बाटली उचलून बसच्या टायरवर फोडली. प्रवाशांनी जोरदार आरडाओरडा केल्याने श्रेयस सरपाले व इतर कारमधून पसार झाले.
मद्यधुंद युवकांनी भर रस्त्यात प्रवासी बस अडवून धिंगाणा घालत बस चालकाला मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडल्याने परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. यादरम्यान बसमधील एका प्रवाशाने या सर्व घालेन व्हिडिओ काढला आहे जो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.