क्राईमताज्या बातम्या

माळेगावात तरुणावर जीवघेणा हल्ला; जातीयवादातून मारहाण

बारामती | माळेगाव येथे वाघमारे आणि शेख कुटुंबात जुन्या वादातून झालेल्या वादात लोखंडी रॉड, दगड, विटाने झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघे जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी परस्परांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जातीयवादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला, असा आरोप वाघमारे कुटुंबाने केला आहे.

याबाबत ज्योती सत्यवान वाघमारे (रा. जोशीवाडा, माळेगाव बु., ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहाजहान शेख, दाऊद शेख, रहिम शेख, मदिना शेख (सर्व रा. जोशीवाडा माळेगाव बु. ता. बारामती) या चौघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून शहाजहान शेख यांनी जातिवाचक शिवीगाळ करून फिर्यादीला रॉडने मारहाण केली. या वेळी फिर्यादीचा मुलगा साहिल त्यांना वाचविण्यास आला असता, शेख याने त्यालाही बेदम मारहाण केली. रहिम शेख याने फिर्यादीचा लहान मुलगा सिद्धांतला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

या वेळी फिर्यादीचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या चारही आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत इतर कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तपास करत आहेत.

फिर्यादी ज्योती वाघमारे म्हणाल्या की, शेख कुटुंब नेहमीच जातीवरून आम्हाला हिणवत असते. माझ्या
मुलाला कारण नसताना त्यांनी जीव जाईपर्यंत मारहाण केली आहे. आमच्या जीवाला धोका आहे. पोलिसांनी आमची बाजू समजून घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ज्योती वाघमारे यांनी केली आहे. दरम्यान, मदिना शहाजहान शेख यांनीही उलट तक्रार दाखल केली आहे.




Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये