ताज्या बातम्यादेश - विदेशशिक्षण
सीबीएससीनं जाहीर केल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा; ‘असे’ असेल सविस्तर वेळापत्रक
नवी दिल्ली : (CBSC Board Exam Timetable) सीबीएससीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही सीबीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे.