ताज्या बातम्या

थंडीच्या दिवसात खा हे शक्तिवर्धक लाडू

पहाटेची थंडी आता जाणवतेय आणि त्यासोबतच ऋतुबदलाची चाहूल शरीराला होऊ लागली आहे. ऋतू बदलला, की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलतात. पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते. या दिवसांत थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायलादेखील मदत होते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढवण्यासाठी काही पारंपरिक लाडू लाभदायक ठरतील.

खजुरचे लाडू

खजूरचे लाडू सर्दी आणि फ्लूपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. हे लाडू खायला चविष्ट असण्यासोबतच खूप आरोग्यदायी देखील आहेत. खजूरांच्या गरम प्रभावामुळे शरीराला उबदार ठेवते आणि ऊर्जा देखील मिळते. शाकाहारी लोकांना प्रोटीन्स मिळण्याचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे  खजूर. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तसेच ज्यांना अपचन, ॲसिडीटी असा त्रास वारंवार होतो त्यांनी खजूर नियमितपणे खावे. यामुळे पचन शक्ती चांगली होऊन पचन संस्थेचे कार्य उत्तम होते.

image 7

मेथीचे लाडू

थंडीच्या काळात मेथीचे लाडू चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही तितकेच चांगले असतात. या लाडूंचे सेवन करून संपूर्ण हिवाळा सर्दी-पडसं, खोकला, ताप किंवा इतर साथीच्या रोगांशिवाय सुरक्षितरित्या घालवू शकतो. मेथी हे गरम पदार्थ आहेत. या काळात शरीराला आतून उष्णता प्रदान करते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडादेखील या मेथीयुक्त पदार्थाच्या सेवनाने कमी होतो, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मिळतात.

image 9

डिंकाचे लाडू

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरते. डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते. या लाडूमुळे हाडे मजबूत होतात. कोमट दुधासोबत लाडू खाल्ल्याने हाडे आणि स्नायूंवर चांगला परिणाम होतो. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवते. पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीसुध्दा लोक डिंकाचं सेवन करतात.

image

तिळाचे लाडू

थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तसेच हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि खोकला आणि सर्दीपासून सुरक्षित राहण्यास मदत होते. तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात. हे सर्व घटक आपल्या शरीरातील अविभाज्य भाग जसे की डोळे, यकृत आणि इतरांसाठी फायदेशीर आहेत.

image 1 1

अळिवाचे लाडू

गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अळीवात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात. अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, अनेकांमध्ये लोह, हिमोग्लोबिन या गोष्टींची कमतरता असल्याने अॅनिमियासारख्या किंवा इतर समस्या उद्भवतात, मग अशावेळी याचे सेवन फायदेशीर ठरते. त्यातील फ्लॅव्हेनॉइडस, टॅनिन्स, अल्कलॉइडस यकृताचे संरक्षण करण्यासाठी मदत करतात. 

image 1 2

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये