ताज्या बातम्यापुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज सोमवारी (ता. २९) दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. खालील मार्गांवर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतुक करण्यात येणार आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रोड चौक. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद करण्यात येत आहे. बिशप स्कूल चौक ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. या मार्गावरील वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बेऊर रस्ता चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

सभेसाठी वाहने लावण्याची व्यवस्था

पुणे-सोलापूर रस्ता, सासवड रस्त्याने पुण्याकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाचालकांनी भैरोबा नाला चाैक ते वानवडी बाजार चौकी दरम्यान वाहने लावावीत. वानवडी बाजार ते लष्कर भागातील मम्मादेवी चौक दरम्यान वाहनचालकांनी वाहने लावावीत. नगर, पिंपरी-चिंचवड भागातून सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊस, मोरओढा चौक, वाॅर मेमोरिएल चौक ते घोरपडी गाव, घोरपडी रेल्वे गेट, आर्मी पब्लिक स्कूल येथे वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सातारा, सिंहगड रस्ता, स्वारगेट भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी बेऊर रस्ता चौक, लष्कर भागातील काेयाजी रस्ता, अंतर्गत रस्ते, तीन तोफा चौक (हाॅटेल डायमंड क्वीन परिसर, लष्कर भाग), बिशप स्कूल परिसरात वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासगी बस लावण्याची सुविधा हडपसर भागातील रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. भैरोबा नाला ते आर्मी पब्लिक स्कूल परिसरात अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जड वाहनांना बंदी

पंतप्रधानाच्या सभेच्या निमित्ताने जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर रस्ता, थेऊर फाटा, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, बोपदेव घाट रस्ता, खडी मशीन चौक, सातारा रस्ता, कात्रज चौक, सिंहगड रस्ता, वडगाव पूल, पौड रस्ता, चांदणी चौक, बाणेर रस्ता, ओैंध रस्ता, राजीव गांधी पूल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, हॅरिस पूल, आळंदी रस्ता, लोहगाव रस्ता, नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

वाहनचालकांना आवाहन

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, कोरेगाव पार्क परिसरात, मुंढवा ताडीगुत्ता चौक परिसरातील वाहतुकीचा वेग संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सोमवारी दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये