Top 5आरोग्यइतरताज्या बातम्यादेश - विदेशपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पुण्यात जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज , २२ जणांना स्वास घेण्यास श्वास परिसरात सर्वत्र खळबळ …

Pune Gas leakage:

पुण्यातील पिंपरी चिंचवड (pimpri-chinchwad ) येथील कासारवाडी परिसरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात सकाळी २० ते २२ जण पोहण्यासाठी आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी देखभाल करणारे आणि सुरक्षारक्षक देखील होते. तलावात पोहताना मात्र अचानक अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला तेथील परिसरात क्लोरिन गॅस (chlorine gas) पसरल्याने काही अंतरापर्यंत नागरिकांना खोकला, गळ्याचा त्रास आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. ह्या पसरारलेल्या गॅसमुळे जलतरण तलावातील काहीजण नंतर बेशुद्ध देखील पडू लागले.

अग्निशामक दलाला हि माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर बेशुद्ध पडलेल्या आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या महापालिका सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांच्यासह पोहण्यास आलेल्या नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ह्या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयात जाऊन उपचारार्थी भेट घेऊन माहिती जाणून घेतली.

या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा समोर येत आहे. घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडली होती. त्यामुळे महापालिकेचा हलगर्जीपणा समोर आला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनं आम्ही आमच्या मुलांना पोहायला पाठवायचे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये