फिचरराष्ट्रसंचार कनेक्टस्टार्ट अप

संसारातून वेळ काढून ‘गाभा क्रिएशन”ची निर्मिती

लग्नापासून कायम घर, मुलं-बाळं यातून थोडासा वेळ काढून आपणही काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येक महिलेलाच वाटतं. आपल्या आवडीची नोकरी, व्यवसाय असं काहीतरी. मात्र घराच्या कामातून वेळ मिळत नसल्यानं ते अवघड जातं. मात्र, सगळी कारणे बाजूला करून पुण्यातील गौरी संत आणि भक्ती देशपांडे या दोघींनी व्यवसाय करण्याचा निर्धार केला. २०१७ मध्ये त्यांनी एक व्यवसाय सुरु केला. सध्या पुण्यात अनोख्या डिझाईन्सचे लेडीज वेअर तयार करणारे म्हणून प्रसिद्ध असलेले गाभा क्रिएशन्स त्यांच्या मालकीचे आहे.

सुरुवातीला काय व्यवसाय करायचा याची देखील त्यांना कल्पना नव्हती. मात्र, काही दिवस विचार केल्यानंतर त्यांनी कपड्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात करताना अनुभव नसल्याने व्यवसायासंबंधित त्यांनी अगोदर संपूर्ण माहिती मिळवली.
पहिल्यांदा कापडाची मोठी बाजारपेठ असलेलं अहमदाबाद त्यांनी गाठलं. तिथून कपड्यासाठी लागणारा कच्चा माल त्यांनी पुण्याला आणला. सुरुवारीला त्यांनी तागे आणले आणि कॉम्बिनेशन्स बनवून ड्रेस पीस विकायला ठेवले नंतर त्या ताग्यातून वेगळी कॉम्बिनेशन करून डिझायनर साडी बनवण्याची सुरुवात झाली. अशा हटके साड्यामुळे ‘गाभा क्रिएशन्स’ची माउथ पब्लिसिटी होऊन जास्तीत-जास्त ग्राहकांपर्यंत पोचत गेलं.

देशभरातील विविध प्रकारची कापडं आणि त्यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार करण्यात आलेल्या साड्या, ड्रेसेस, ब्लाउजेस, ओढणी बनवणं हे काम गाभा क्रिएशन्स करतं. त्यावर चित्र, चिन्ह, रांगोळ्या हे गाभा मध्ये हॅंडपेंट करून दिलं जातं. नवरात्रीमध्ये नऊ देवींचे मुखवटे, गणपतीचं चित्र, दक्षिणेतल्या रांगोळ्याचे आकार, सरस्वतीची नक्षी मध्यप्रदेशातील लेण्यामधील चित्र अशा अनेक डिझाईन्स आपल्या साडीवर, ब्लाउजवर तोरणावर पेंट करून कस्टमाइझ करून गाभा मध्ये मिळतो. गौरी संत आणि भक्ती देशपांडे यांना त्यांच्या सोशल मिडीया वरूनच मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत असल्याचं त्या सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये