ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

यंदा पाऊस कमी असला तरी रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार; कृषिमंत्र्यांचा दावा

पुणे : (Dhananjay Munde On State Farmers) राज्यात यंदा पाऊस कमी असला तरी रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. राज्यातील सरासरी ५३.९७ हेक्टर वर रब्बीचे पीक घेतले जाते. यंदा त्यात ९% ची वाढ होऊन एकूण ५८.७६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात दिली. गहू आणि हरबऱ्याचे क्षेत्र सरासरी इतकेच ठेवले जाणार आहे. तर रब्बी ज्वारी तसेच तेलबियांचे क्षेत्र वाढवण्यात येणार आहे. पिक नियोजनाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आणि रब्बीचे वाढीव क्षेत्र यांचे योग्य संतुलन साधणार असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. हे सगळे सांगत असताना पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी भरलेल्या असल्याचा अजब दावाही कृषिमंत्र्यांनी केला आहे.

दरवर्षी पेक्षा काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला. दुहेरी परिस्थिती आहे. रब्बीचे क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे. १ कोटी ७० लाख शेतकर्‍यांनी १ रुपया पीकविमा काढला आहे. त्याचा मोठा फायदा होईल. दोन्ही संकटे असली तर फक्त १ रुपयात संरक्षण झालेलं आहे. डिसेंबरपर्यंत मुदत आहे. रब्बीच्या पिकाचा लाभ घेतला पाहीजे. यांत्रिकीकरणाच्या बाबतीत ड्राॅ काढावा लागतो. तीन योजना आहेत. यात पैसे यावे लागतात. मार्च नंतर ड्राॕ निघाला नाही याची माहिती घ्यावी लागेल. मागच्या वेळी पेक्षा जास्त बजेट यावेळी ड्राॅसाठी ठेवलं आहे. लाभार्थी पात्रता तपासून यांत्रिकीकरणासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

आमचं सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर बीड जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर पाण्याची कमतरता भासल्यास विहिरीच्या अधिग्रहण करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये