न्युट्रीशियनफिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

संधिवात व गाऊट या रोगांमधील आहार

-जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

संधिवातामध्ये सांध्यांवर सूज येते. सांधेदुखी वाढू लागते. बऱ्याच वेळा युरिक ॲसिड वाढल्यामुळे (गाउट) सांधेदुखी होते, तर अशा वेळी आहारातील काही पदार्थ वर्ज्य करायचे असतात, तर काही पदार्थांचा समावेश केला असता संधिवातावर मात करणे शक्य आहे.

आहारात घ्यावयाची काळजी
– अति थंड पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
– चना, छोले, राजमा, हरभरा अशा शरीरात वात निर्मिती करणाऱ्या पदार्थांचे सेवन वर्ज्य करावे.
– अतिरिक्त मीठ जसे, की पापड, लोणची, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड यांचे सेवन वर्ज्य करावे. कारण मिठामुळे सांध्यांवरील सूजेमध्ये वाढ होऊ शकते.
– शारीरिक वजनावर नियंत्रण करावे. वाढत्या वजनामुळे सांध्यांवर दाब वाढवून सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे संधिवात असणाऱ्या रुग्णांनी अथवा युरिक ॲसिड वाढलेल्या रुग्णांनी पचायला हलका व वजन नियंत्रित करणारा आहार घ्यावा.
– संधिवात व गाउट असणाऱ्या रुग्णांनी मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे. धूम्रपान व मद्यपानामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. वेदना वाढू शकतात.
– गाऊट असणाऱ्या रुग्णांनी सीफूड नॉनव्हेज वर्ज करावे.

संधिवातामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा.
– सर्व आंबट चवीची फळे संत्री, मोसंबी, किवी, पेरू, स्ट्रॉबेरी, पायनापल ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे अशी फळे खावीत. युरिक ॲसिडसारख्या रोगांमध्ये अँटिऑक्सिडण्ट्‌स वेदना कमी करतात.
– सफरचंदामध्ये असणारे मॅलिक ॲसिड सांध्यांवरील सूज कमी करण्यास मदत करतात.
– आवळा पावडर अथवा आवळ्याचा रस गुळासोबत अथवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गुळाशिवाय पाण्यातून घेतल्यास खूप फायदा होतो.
– संधिवात व गाऊट दोन्ही रोगांमध्ये रोज केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
– गाऊट व संधिवातामध्ये क व अ जीवनसत्त्वाच्या बाबतीत स्ट्रॉबेरी सफरचंदापेक्षाही उत्तम आहे. त्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड बाहेर काढण्यास त्याची मदत होते. म्हणूनच गाउटच्या रुग्णांना ते उपयोगी आहे. स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये चहा, कॉफीऐवजी विनासाखरेचा स्ट्रॉबेरीचा रस घेणे अथवा स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरेल.
– संधिवात, गाउट या दोन्ही रोगांमध्ये वजनावर नियंत्रण आणणे खूप महत्त्वाचे असते. तसेच शरीरातील आम्लधर्म वाढल्यामुळे हे दोन्ही रोग बळवतात तेव्हा दुधी भोपळ्याचा वापर आहारात केल्यास शरीरातील आम्लता कमी होते. दुधी ही एकमेव अल्कली फळभाजी आहे. दुधी भोपळ्याची भाजी/सांबार/चटणी/पराठे/रायतं/सूप खाऊ शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये