ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

Navale Bridge Accident: नवले पुलावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेनंतर चालत्या ट्रकने घेतला पेट

पुणे | Navale Bridge Accident – काल (16 ऑक्टोबर) रात्री 9.13 वाजता नवले पूल (Navale Bridge), स्वामीनारायण मंदिराजवळ एका ट्रकचा भीषण अपघात (Truck Accident) झाला. कंटरेनरने धडक दिल्यानंतर चालत्या ट्रकने पेट घेतला आणि त्यावेळी ट्रकमध्ये काही लोक अडकले होते. तर या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर दलाकडून मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच नवले, सिहंगड व पीएमआरडीए कडून एक फायरगाडी व एक रेस्क्यू व्हॅन तातडीने रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच तेथे ताबडतोब आग विझवत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. सदर घटनास्थळी एक पुरुष, एक महिला व दोन मुले अशा चार जणांना गंभीर स्वरुपात जळलेल्या अवस्थेत दलाच्या जवानांनी बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. प्राथमिक माहितीनुसार, सदर चार जण मृत असण्याची शक्यता असून एक पुरुष जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीकडून समजलेल्या माहितीनुसार, हा ट्रक ज्यामधे हे सर्व लोक अडकले होते तो एका कंटेनरला धडकला आणि कंटेनर पलटी झाला. त्याचवेळी सदर ट्रक वेगात असल्याने पुढे पुन्हा एका मोठ्या वाहनाला धडकला आणि त्याचवेळी धडकेमुळे लगेच ट्रकने पेट घेतला.

https://www.instagram.com/reel/CyfYmGkCgfi/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये