फिचरफुड फंडाराष्ट्रसंचार कनेक्ट

डोसा प्रेमींसाठी…आयप्पा डोसा सेंटर

डोसा हा साऊथ इंडियन पदार्थ जरी असला तरी महाराष्ट्रीयन खवय्यांचा आवडता पदार्थ ठरला आहे. डोश्याचं नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. तसेच इडली, डोसा असे साऊथ इंडीयन पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतात. मग लहाणांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण साऊथ इंडीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवर्जून जातातच. त्यासाठी खवय्यी सकाळी उठल्यानंतर नाष्टा करण्यासाठी, तरुण तरुणी कॅालेजला जाताना, काही लोक फीरायला जाताना किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर किंवा काही खाण्याचा मुड झाला तर साऊथ इंडीयन पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एखाद्या प्रसिद्ध अशा हॅाटेलमध्ये जातातच. तर अशाच खवय्यांसाठी आयप्पा डोसा सेंटर प्रसिद्ध आहे.

आयप्पा डोसा सेंटर हे सुब्रमनी देवन यांचं आहे. आयप्पा डोसा सेंटर हे 40/524, पीसीएमसी लिंक रोड, शास्त्रीनगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी चिंचवड येथे आहे. आयप्पा डोसा सेंटरची स्पेशल डोसा, मसाला डोसा, कट डोसा, चीज डोसा, स्पेशल इडली, इडली चटणी सांबर, इडली सांबर, इडली वडा, इडली चटणी, उडीद वडा असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत. तसंच हे हॅाटेल साऊथ इंडीयन नाष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आयप्पा डोसा सेंटरने खवय्यांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली आहे. सोबतच बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे हे हॅाटेल सर्वांच्या आवडीच बनलं आहे.

विशेष सांगायचं झालं तर आयप्पा डोसा सेंटरमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडणारे आहेत. सोबतच या हॅाटेलचे आदरातिथ्य खव्वयांना पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडते. तर तुम्हाला साऊथ इंडीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा सुट्टीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र मैत्रिणीं सोबत, परिवारासोबत टाईम स्पेंड करायचा असेल, पार्टी करायची असेल तर आवर्जून आयप्पा डोसा सेंटरला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये