एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एन्काऊंटर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान अँटिलियाजवळ स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि उद्योगपती मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणा माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी सिद्ध झाले आहेत. या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 8 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर 11 आरोपींची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. दरम्यान हे लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरण काय होतं? हे जाणून घेऊयात…
लखन भैया एन्काऊंटर प्रकरण काय?
मुळचा वसईचा असलेला राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या (33) हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा जवळचा सहकारी होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करायचा. प्रदीप शर्मा यांच्या टीमकडून लखन भैयाला ‘अनिल भेडा’ या व्यक्तीसोबत नवी मुंबईतल्या वाशी येथून उचलण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोव्यातील नाना नानी पार्कमध्ये लखन भैयाचे एनकाऊंटर करण्यात आले. हे एनकाऊंटर 2006 मध्ये करण्यात आले होते
लखन भैय्याच्या एनकाऊंटरनंतर चारच दिवसात लखन भैय्याच्या भावाने बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली आणि हे एनकाऊंटर नसून लखन भैय्याचा थंड डोक्याने खून करण्यात आला आहे असा आरोप केला. या साऱ्या प्रकरणाची जेव्हा 2013 मध्ये चौकशी कऱण्यात आली तेव्हा असे आढळले की लखन भैय्या याच्यावर पॉईंट ब्लँक रेंजवरुन गोळी झाडण्यात आली आणि त्याचा खून करण्यात आलाय. एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे या पथकाचे प्रमुख होते.