अर्थइतरताज्या बातम्यादेश - विदेश

आयकर विभागाची सर्वात मोठी रेड; पैसे मोजता मोजता मशीनही झाल्या डेड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Income Tax Raid | तुम्ही अजय देवगणचा ‘रेड’ (Raid) हा चित्रपट पाहिलाच असेल. हा चित्रपट एका धाडसी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली अन्य अधिकाऱ्यांनी केलेल्या खऱ्याखुऱ्या छापेमारीवर आधारित आहे. तर आता याच चित्रपटाची पुनरावृत्ती ओदिशा आणि झारखंडमध्ये झाली आहे. आयकर विभागानं (Income Tax Department) ओदिशा (Odisha) आणि झारखंडधील (Jharkhand) बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत आयकर विभागानं नोटांचे मोठ मोठे बंडल जप्त केले आहेत.

ओडिशातील संबलपूर, बोलंगीर आणि झारखंडमधील लोहरदगा, रांची येथील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला. या छापेमारीत समोर आलेली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या छापेमारीत आयकर विभागानं जी रोकड जप्त केली आहे ती इतकी आहे की, ते पैसे मोजता मोजता चक्क नोटा मोजण्याची मशिनच बंद पडली आहे. तसंच अजुनही ही छापेमारी सुरूच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल 50 कोटी रूपयांच्या नोटांची मोजणी बुधवारपर्यंत पूर्ण झाली होती. तरी देखील अजूनही मोठ्या प्रमाणात नोटा शिल्लक राहिल्या आहेत. तर या नोटांची संख्या एवढी जास्त आहे की, नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशीनही बंद पडल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये