भारत आणि अफगाणिस्तान सामनाचे ठिकाण, वार, वेळ, संघ, सर्व माहिती फक्त एकाच क्लिकवर…
मोहाली : (India vs Afganistan 1st T20 Match) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना हा ११ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्याची वेळ काय असेल, तो कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळू शकतो. ठिकाण कोणते असेल, संघात खेळाडू कोणते असतील. या सामन्यासाठी भारतीय संघ कसा असेल, ही सर्व माहिती आता फक्त एका क्लिकवर पाहायला मिळू शकते.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजता टॅस करण्यात येईल. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपला संघ जाहीर करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच संध्याकाळी ७.०० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे स्पोर्ट्स १८ या टीव्ही चॅनेलवर पाहता येऊ शकतात. पण जे टीव्ही पाहू शकत नाहीत ते हा सामान Jio Cinema वर फ्रीमध्ये पाहू शकतात.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान, मुकेश कुमार.