ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदेशाहीचा विजय! आधी निवडणूक आयोग, नंतर न्यायालय आणि आता विधानसभेत ठाकरेंना मात

Shiv Sena MLAs Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिला. शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत एकनाथ शिंदे हेच वरचढ ठरले असून त्यांनी तिसऱ्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तिसऱ्यांदा मात केली आहे. आधी निवडणूक आयोग, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि आता विधानसभा सभागृहात अशा तीन वेळच्या थेट लढतीत एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरले आहेत.

निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेच्या बाजूने
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल देत पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना दिलं. सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे यांची ही पहिली बाजी होती.

सर्वोच्च न्यायालयातही वरचढ
शिवसेनेचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या गटानेच बाजी मारल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिंदे गटाचं सर्व काही चुकलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आपण परत मागे जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले.

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदे यांच्याच बाजूने
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांसमोर आल्यानंतर या ठिकाणीही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर मात केल्याचं दिसलं. दोन्ही गटाचे आमदार अपात्र ठरले नसले तरीही शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा राहुल नार्वेकरांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये