ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर, शरद पवारांनी ‘त्या’ मुद्यावर बोट ठेवत म्हणाले, हि आमच्यासाठी उत्तम संधी..

मुंबई : (Shiv Sena MLA Disqualification Case) शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्याविरोधात जाऊन निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल आणि तिथे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल अस आजच्या निकालावरून वाटत आहे. विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही याकडे ही पवार यांनी लक्ष वेधले.

“दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि सहा-सात महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय आता जनतेच्या न्यायालयात गेला आहे. जनताच यावर निर्णय घेईल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर जाऊन सदर विषय मांडू. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल न्यायालयीन नसून राजकीय निकाल आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम संधी प्राप्त झाली आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये