विराट कोहली बाहेर, एका जागेसाठी 2 दावेदार! ‘हा’ स्टार करणार पदार्पण?
India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तीन दिवस आधी विराट कोहलीने आपले नाव मागे घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, विराट कोहली बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी कोण घेणार? बीसीसीआयने अद्याप बदलीची घोषणा केली नसली तरी सध्याच्या संघानुसार या जागेसाठी दोन दावेदार आहेत.
विराट कोहलीची जागा कोण घेणार?
विराट कोहलीची कसोटी संघात जागा चौथ्या क्रमांकावर आहे. या क्रमांकावर तो खेळत असतो. पण आता त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल हा एकमेव पर्याय आहे, जो विराटची जागा घेऊ शकतो. म्हणजेच राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघातील सहावा फलंदाज कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यात या क्रमांकासाठी लढत आहे.
ध्रुव जुरेल पदार्पण करणार?
राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू ध्रुव जुरेलची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तो कधी पदार्पण करतो हे पाहणे बाकी आहे. पहिल्या दोन कसोटींसाठी त्याची संघात निवड झाली आहे. आता विराट कोहलीच्या जाण्याने त्याच्यासाठी एक संधी निर्माण झाली आहे.
ध्रुव जुरेल किंवा केएस भरत यांनाच संघात स्थान मिळू शकते. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यांवर नजर टाकली तर केएस भरतने नुकतेच शतक झळकावून आपला दावा मजबूत केला आहे.
टीम इंडियाची संभाव्य Playing 11 – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत/ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.