चक दे इंडिया! भारतीय पुरूष हॉकी संघाची सुवर्ण कामगिरी; जपानचा 5-1 ने पराभव करत मिळवलं गोल्ड मेडल
Asian Games | एशियन्स गेम्समध्ये (Asian Games) भारत (India) चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. यंदा भारतीय खेळाडूंनी 72 वर्षातील पदकांचा विक्रम मोडत देशाने प्रथमच 100 पदके जिंकली आहेत. यामध्ये भारतीय पुरूष हॉकी संघानं (Indian Men’s Hockey Team) दमदार कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी संघानं जपानचा (Japan) 5-1 ने पराभव करत गोल्ड मेडल (Gold Medal) मिळवलं आहे.
यंदा एशियन्स गेम्समध्ये भारतीय हॉकी संघ एकही सामना हारलेला नाहीये. पहिल्या सत्रापासूनच भारतानं जपानवर आघाडी मिळवली होती. भारताच्या मनप्रीत सिंहनं पहिला गोल मारला. त्यानंतर जपानंन रिव्ह्यू घेतला आणि तो निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. पण तिसऱ्या पंचानं गोल असल्याचं सांगितलं. त्यामुळे भारतीय संघाला पहिली आघाडी मिळाली.
तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातही भारतीय संघानं दमदार कामगिरी करत आघाडी कायम ठेवली. तर भारतानं जपानचा 5-1 ने पराभव करत विजय मिळवला. या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघानं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.