भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ; 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा केला पार
नवी दिल्ली | India GDP : भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेनं पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता लवकरच देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचू शकते. तसंच भारताचं 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य आहे.
18 नोव्हेंबरलाच भारतानं 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता. त्यामुळे आता भारत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो. तसंच भारत आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांमधील अंतर फार कमी राहिलं आहे. त्यामुळे भारत जर्मनीला मागं टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था ही 26.7 ट्रिलियन डॉलरची आहे त्यामुळे अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांनी अर्थव्यवस्था 19.24 ट्रिलियन डॉलरची आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान असून त्यांची अर्थव्यवस्था 4.39 ट्रिलियनी आहे. तर जर्मनी चौथ्या स्थानावर असून त्यांनी अर्थव्यवस्था 4.28 ट्रिलियन डॉलरची आहे. तसंच भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे.