Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पालिका जोडणार ‘7 मिसिंग लिंक…’

Pune :

पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन रस्त्यांसह अनेक रस्त्यानचा अभ्यास केला होता. यामध्ये ५२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सुमारे ७२० तुकडे शोधण्यात आले होते. या रस्त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यातील ३८ रस्ते हे १०० मीटर ते अडीच किलोमीटर लांबीपर्यंतचे असल्याचे दिसून आले आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ढाकणे यांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये अवघ्या १००, २०० मीटरचा रस्ता नसल्याने वाहन चालकांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने पहिल्या टप्प्यात सात रस्त्यांची निवड केली. सातपैकी चार रस्त्यांची कामे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहेत, उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

पहिल्या टप्प्यात सात मिसिंग लिंकचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील चार रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. पुणे शहरात सुरु असलेली रस्त्याची कामे ही पुढील प्रमाणे आहेत,

  • सिंबायोसिस ते विमाननगर
  • कोद्रे फॉर्म ते प्रयेजा सिटी सिंहगड रस्ता
  • विमाननगर सर्वे क्रमांक २३३
  • नवले पूल ते भूमकर चौक
  • २३५० विमानतळ रस्ता ते विमाननगर
  • काळेपडळ ते रवी पार्क
  • व्ह्युम फॅक्टरी ते पासलकर चौक

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये