क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजनशेत -शिवार

मिचेल मार्शचे लज्जास्पद कृत्य! उर्वशी रौतेला संतापून म्हणाली, “भावा, थोडा तरी”

Urvashi Rautela Post on Mitchell Marsh World Cup 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup 2023) नुकताच पार पडला असून यात ऑस्ट्रेलियाने विश्चषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शलच्या (Mitchell Marsh) एका कृत्याने मात्र क्रिकेट फॅन्सने संताप व्यक्त केला.

मिचेल मार्शलचा वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता यासंदर्भात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक खास पोस्ट शेअर करत मिचेल मार्शनला सुनावलं आहे. “भावा, वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी आदर कर”, असं ती म्हणाली आहे.

उर्वशी रौतेलाची इंस्टा पोस्ट काय आहे? (Urvashi Rautela Post)
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे. आता तिने इंस्टा पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”मिचेल मार्शल भावा… वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी मान ठेव…फक्त कूल दिसण्यासाठी मिचेलने ट्रॉफीवर पाय ठेवला आहे”. उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे मिचेल मार्शलसाठी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

afg

उर्वशीने शेअर केला वर्ल्डकप ट्रॉफीसोबतचा फोटो
उर्वशीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये उर्वशीने गोल्डन आऊटफिटमध्ये ‘वर्ल्ड कप 2023’ची ट्रॉफी हातात घेतलेली दिसत आहे. तर दुसरीकडे त्याच ट्रॉफीवर मिचेल मार्शनने पाय ठेवलेला पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये