२०२४ मध्ये कंगना भाजपकडून लढणार लोकसभा निवडणूक; तिच्या वडिलांनी दिली मोठी अपडेट
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) २०२४ या नवीन वर्षात चाहत्यांना सरप्राइज गिफ्ट देणार आहे. ती आता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. यावर बराच वेळ चर्चा होत होती. अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत होते. आता तिच्याच वडिलांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कंगना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या वतीने उभी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कोणत्या जागेवरून, हे अद्याप ठरलेले नाही.
कंगनाचे वडील काय म्हणाले?
कंगना रनौत लोकसभा निवडणूक 2024 लढणार का यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंगना रनौतचे वडील अमरदीप रनौत यांनी नुकतचं एका मुलाखतीत त्यांची लेक भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे”.
अमरदीप रनौत पुढे म्हणाले,”कंगना रनौत कोणत्या भागातून निवडणूक लढवणार याचा निर्णय पार्टी घेईल. कंगना रनौतचं कुल्लू येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. कंगना रनौतने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं आहे.
कंगनाने राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. अभिनेत्री म्हणालेली,”कलाकार असल्यामुळे राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल मी खूप इच्छुक आहे. पण सध्या तरी मी राजकारणात एन्ट्री करणार नाही. भारत देश प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे”.